‘स्वस्ताई’ असलेल्या जगातील ११२ देशांच्या यादीत भारताने द. आफ्रिके नंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘गो बँकिंग रेट्स’ने यासंदर्भात पाहणी केली असून खरेदीची क्षमता, भाडे, किराणा मालाचे भाव आणि ग्राहक किंमत निर्देशांक या चार निकषांवर ही पाहणी करण्यात आली आहे.दैनंदिन वापराच्या वस्तू आणि किराणा माल इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त असल्याचे पाहणीत म्हटले आहे.जगातील सर्वात स्वस्त ५० देशांमध्ये भारताची लोकसंख्या सर्वाधिक असली तरी प्रमुख शहरांत राहणाऱ्या लोकांची खरेदी क्षमताही इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे.न्यूयॉर्कपेक्षा भारतातील भाडे ७० टक्क्यांनी कमी असून किराणा आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू ४० टक्क्यांनी स्वस्त आहेत.सर्वाधिक महागड्या देशांमध्ये बर्म्युडा, बाहमास, हाँगकाँग, स्वित्झर्लंड आणि घाना यांचा समावेश आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews